उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली शहरातील श्रावस्ती बुद्ध विहारामध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग उपस्थित होता.
यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शन डॉ.संपतराव गायकवाड सर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी महिला चळवळी बाबत योगदान आणि आजची महिला याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महिला दिनानिमित्त अनेक मुलींनी वेशभूषा करून मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला अतिशय अनेक सदाबहार भीम गीते सादर केली आणि अश्या प्रकारे जागतिक महिला दिन एक प्रकारे उत्सव म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी श्रावस्ती विहाराच्या महिलांनी अतिशय उत्तम रित्या नियोजन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित होते.

