देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- प्रियदर्शनी इंदिरा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल सुरज नगर हिंगणा यांच्यावतीने ग्रॅज्युएशन डे हा कार्यक्रम महालक्ष्मी लाॅन येथे साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे संचालक धर्मेंद्र कोहाड, दिपावली संदीप कोहाड मॅडम उपस्थित होत्या, तसेच पालक वर्गाचे प्रतिनिधी म्हणून शुभांगी सचिन चांनपुरकर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपावली कोहाड मॅडम यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना घाटुर्ले मॅडम यांच्या निदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यात नर्सरी, केजी १/केजी २ या वर्गातील चिमुकल्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी सर्व चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी शिक्षक नेहमी हसत खेळत शिक्षण देतात पण त्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीसाठी शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन गरजेचे असते असे उद्गार दिपावली कोहाड यांनी यावेळी काढले. लहानपणी घेतलेले धडे हेच बाल विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सार असते असेही श्रीमती कोहाड म्हणाल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन मॅडमने केले तर आभार प्रदर्शन हेमलता मॅडमनी केले पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

