अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १४ मार्च:- तेली समाज महिला मंडळ सावनेर च्या वतीने १३ मार्च ला कृष्णा कॉम्प्लेक्स येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नगर परिषदच्या मुख्याधिकारी किरण बगडे तसेच जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिरसकर वाकोडी सर्कल, पुष्पाताई देशमुख सामाजिक कार्यकर्त्या, अनिता सुरकार व वैशालीताई गो.घटे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कविता पिसे,शुभांगी उमाटे व वैशाली प्र.घटे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणाताई अंतुरकर यांनी केले. यावेळी न.प.मुख्याधिकारी बगडे मॅडम यांनी सफाई कामगार महिलांना सोबत घेऊन केक कापला व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करुन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
काळानुसार महिलांना सन्मान मिळाला आहे. नारी ही घराचा आधारस्तंभ आहे. तीला वाटले तर आपल्या घराला स्वर्ग बनवेल आणि वाटले तर नर्क ही बनवू शकते.इतकी ताकद महिलांमध्ये आहे आणि त्या शक्तीला ओळखून नारीने स्वतःच जीवन सुख आनी समृद्धीने संपन्न कराव असे उक्त उद्गार जिल्हा परिषद सदस्य ज्योती शिरसकर मॅडम यांनी आपल्या वक्तव्यात मांडले.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी महिलांसाठी विविध स्पर्धांचा आयोजन केलेलं होतं त्यात महिलांनी भरभरून उत्साह दाखविला.तत्पश्चात सर्वांना अल्पोहार वितरण करण्यात आले. यावेळी आभार वैशाली गो.घटे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सुचिता देशमुख, वैभवी तपासे, सोनाली उमाटे,श्रद्धा देशमुख, चेतना घटे, मेघा घटे व वैशाली पाटील यांनी परिश्रम घेतले.

