शिवसेनेचे नेते राजु खुपसरे व सतिश धोबे याच्या मार्गदर्शनात काढण्यात आली भव्य शोभायात्रा
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट शहरात रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त २८ मार्चला सायंकाळी ७ वाजता कारंजा चौकातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून शहरातील कारंजा चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ढोल ताश्याच्या गजरात रैली काढण्यात आली.
यावेळी विद्युत रोषणाईत ढोल ताश्याच्या गजरात काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा शिवसेनेचे वरीष्ठ नेते राजु खुपसरे व सतिश धोबे याच्या मार्गदर्शना काढण्यात आली. यावेळी शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.
यावेळी लेझिम पथक, दांडपट्टा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या शोभायात्रे दरम्यान उपस्तिथ शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकच जयघोष केला.

