यावेळी नागरिकाच्या विविध समस्या या विषयावर चर्चासत्र
प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुलगाव:- शहरातील वार्ड क्रमांक दोन तार फाईल येथे भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या मार्गदर्शनात पुलगाव येथे शाखेची बैठक संपन्न झाली. यावेळी नागरिकाच्या विविध समस्या या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी युवांना मार्गदर्शन जेष्ठ नागरिका सोबत संवाद समस्या जाणून घेतल्या आहे.
भीम आर्मीच्या शाखाकरिता वार्डामध्ये सार्वजनिक संवाद बैठक करण्यात आले. भीम आर्मी संस्थापक चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष विनरतन सिंग यांच्या मार्गदर्शनामध्ये भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांच्या संविधानिक मार्गाने अन्यायाविरुद्ध लढण्याच्या कार्याला प्रेरित होऊन भीम आर्मीच्या शाखेची मागणी करण्यात आले तसेच समस्या शिक्षणाचे मार्गदर्शन आणि नागरिकांनी भीम आर्मी मध्ये शामिल होऊन आणखी बळकट करण्याकरिता चर्चासत्र चालले. यावेळी कुणाल चावरे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पार पडला.
त्यावेळेस उपस्थित भीम आर्मी विदर्भ प्रमुख अंकुश कोचे यांनी मार्गदर्शन करून युवा पिढीला संबोधित केले. यावेळी उपस्थित सचिन खैराल, रवि चावरे, गणेश सारवान, विक्की डाबोडे, विकास गोयर, नितीन गोयर, चेतन चावरे, गोविंद खैराल, विनय गोयर, बबलू सारसर, दिनेश चंडाले, रितिक चावरे, यश चावरे, दादु खैराल, निरज रानवे, इत्यादी कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.