श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- हिंदू धर्मात नव्या वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते, यंदा गुढीपाडवा मंगळवारी नऊ एप्रिल रोजी येत आहे. गुढीपाडव्याचे विविध धार्मिक महत्त्व सर्वांनाच माहित आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा शुभ दिवस जसा आहे तसंच यावर्षी प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षी वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. यानिमित्ताने सकाळी ७ वाजता मोंढ्यातील बालाजी मंदिरा पासून भव्य स्वागत फेरीचे आयोजन असून या फेरीचा समारोप सहयोग नगर येथील सर्वेश्वर गणेश मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे होत आहे. या स्वागत फेरीत सर्वांनी सहभाग द्यावा असे आवाहन संयोजक धर्मप्रेमी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे.
गुढीपाडव्याला प्रभू श्रीराम वनवासातून पुन्हा आयोध्देत परत आले, यांच्या स्वागतासाठी गुढी उभारून अयोध्या सजली होती, यावर्षी पाचशे वर्षाच्या संघर्षाच्या इतिहासानंतर परत अयोध्येत प्रभूषण जन्मभूमीत प्राणप्रतिष्ठा सोहळा थाटात संपन्न झाला आहे, त्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदी वातावरण झालेले आहेच या पार्श्वभूमीवर यावर्षी गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आणि नववर्षाचे स्वागत मोठ्या उल्लासात साजरा करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे प्रभात समयी स्वागत फेरीचे आयोजन केले गेले आहे. यासाठी सर्व धर्मप्रेमी संघटना संस्था नागरिकांच्या एका बैठकीत नियोजन झालेले असून सर्वांनी नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र यावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

