प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे झुलेलाल सेवा समितीच्या वतीने झुलेलाल जन्मोत्सव व सिंधी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने झुलेलाल मंदिर प्रांगणात सिंधी समाज संस्कृतीचे दर्शन देणारे विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इष्टदेवता श्री झुलेलासाईच्या भगिनींच्या वतीने ५१ सजावटीचे सादरीकरण केले व ८१ मुलांनी रंगभरो स्पर्धेत सहभाग घेतला. २१ बालकांनी झुलेलाल साईची आरती व पल्लव चे सिंधी भाषेत सादरीकरण केले. कोरिओग्राफर वीरा पाखरानी यांनी मुलांच्या रंगारंग कार्यक्रमात आपले योगदान दिले. महिला संगीत कार्यक्रमात मोठ्या संख्येने सिंधी महिला भगिनींनी सहभाग घेतला.
तत्पूर्वी सकाळी झुलेलाल कमेटी व विकी तकतानी यांच्या सहकार्याने शहरात बाईक रॅली काढण्यात आली. तसेच सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. विविध ठिकाणी सांस्कृतिक नृत्य चे सादरीकरण करण्यात आले. झुलेलाल महिला मंडळ, झुलेलाल महिला सेवा समिती व सुखमनी सेवा मंडळ द्वारा सलग आठ दिवस ताक व मिठी भात चे प्रसाद वितरण करण्यात आले.
नागपूर येथील आयएसएसएस चे अध्यक्ष प्रताप मोटवानी यांचे नेतृत्वात आयएसएसएस हिंगणघाट शाखेच्या अध्यक्ष अनुराधा मोटवानी, झुलेलाल सेवा समितीचे अध्यक्ष प्रहलाद मोटवानी व सुरेश नैनानी, तिरसदास संतांनी तसेच सोनल सामतानी, भावना मोटवानी, भावना सामतांनी, छाया पाखरानी, वीरा पाखरानी हिना अहुजा, तन्वी मोटवानी कृतिका मोटवानी, मनीषा मोटवानी, सपना इसरानी, वंदना आर्य, दिशा शर्मा व दिव्या शर्मा आदींनी विविध कार्यक्रमाचे आयोजना करीता सहकार्य केले.

