हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूकित आज झालेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानात विदर्भातील पाच जागेवर मतदान झाले. त्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सायंकाळी 5 वाजतापर्यंत 56.11 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. सकाळी 7 वाजतापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत 43.48 टक्के मतदान झाले. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रात सायंकाळी 5 वाजता पर्यंत राजुरा 59.14 टक्के, चंद्रपूर 48.20 टक्के, बल्लारपूर 59.06 टक्के, वरोरा 57.56 टक्के, वणी 58.87 टक्के, आर्णी 49.70 टक्के मतदान पार पडले.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आज पार पडलेल्या मतदानाचा आकडा आर्णी व व चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये 50 टक्याच्या खाली टक्केवारी आहे. त्यामुळे प्रशासना तर्फे मतदानाचा टक्का वाढन्यासाठी केलेला प्रयत्नात कडक ऊन आणि मतदारांच्या अनास्थेपुढे कुठेतरी कमी झालेल्या मतदानातून दिसून येत आहे. त्यात तर उर्वरित विधानसभा क्षेत्रात 60 टक्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी आहे.