नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे केला सत्कार
संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 29 एप्रिल:- बँकॉक (थायलंड ) येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील एस.ए. योगा इस्टिट्यूट च्या आठ योगापट्टूना ट्रॅडिशनल रिदमिक सिंगल योगा, रिदमिक पेअर योगा आणी आर्टिस्टिक पेअर योगा या तिन्ही प्रकारच्या योगास्पर्धत तेरा सुवर्ण आणी तीन रौप्य पदक प्राप्त करून संपूर्ण विजेतेपद प्राप्त करण्याचा बहुमान मिळाला. या पदक प्राप्त योगापट्टूचा नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा च्या वतीने राजुरा विश्रामगृह येथे सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला.
13 देशातील 127 योगापट्टूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये शौनक आमटे, साहिल खापणे, श्रीकांत घाणवडे, राम झाडे, सई नेवास्कर, स्वर्णिका नौकरकर, शर्वरी मिटकर, गायत्री पाल यांचा समावेश होता त्यांना पुस्तकं व पेन भेट देऊन तर स्वप्नील पोहणकर व अनिकेत ठक या योग शिक्षक प्रशिक्षक यांचाही शॉल श्रीफळ व वडाचे वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मोहनदास मेश्राम,उपाध्यक्ष नरेंद्र देशकर, राजुरा तालुका अध्यक्ष अनंत डोंगे, राजुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी. यु. बोर्डेवार, कोषध्यक्ष गणेश बेले, मिलिंद देशकर, मनोज कोल्हापुरे, संगीता पाचघरे, विना देशकर, किरण हेडाऊ, वर्षा वैद्य, कृतिका सोनटक्के, नितीन जयपूरकर, ईश्वर वडस्कर, प्रदीप भावे, रवी बुटले, बलवंत ठाकरे,माधुरी कोल्हापूरे, श्रीरंग मनोज कोल्हापूरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागपूर विभाग महिला उपाध्यक्षा सुनैना तांबेकर यांनी केले, प्रस्ताविक शितल मिटकर- कोल्हापुरे यांनी केले तर आभार मोहनदास मेश्राम यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, सदस्य, संघटक यांनी अथक परिश्रम घेतले.

