अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आजोबा आपल्या विवाहीत मुलगी व नातीसह नागपुरवरुन दुचाकीने गावाकडे परत येत असतांना बुट्टीबोरी नजीक त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. यात आजोबाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी व नातीन यांना उपचारासाठी नेत असताना त्यांचाही मुत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार गिरड येथील पुणिराम येनुरकर हे 28 एप्रिलला आपल्या नातलगाच्या साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी नागपूर येथे गेले होते. तेथे साक्षगधांचा कार्यक्रम आटोपून ते 29 एप्रिल रोजी आपल्या दुचाकी क्र. एम.एच 32 ए.एम. 1996 ने हिंगणघाटच्या दत्तमंदीर वार्ड येथील रहिवासी विवाहित मुलगी सौ.सुचिता सुधिर दांडेकर वय 35 वर्ष व नात कु.खुशी सुधिर दांडेकर वय 15 वर्ष या दोघीसह 11.30 वाजताच्या सुमारास गावाकडे परत निघाले असतांना बुट्टीबोरी नजीक त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.
या अपघातात पुनीराम येनुरकर मु.गिरड (समुद्रपुर) यांचा जागीच मृत्यू झाला तर विवाहित मुलगी सौ.सुचिता व नात कु.खुशी दांडेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना दोघिंचा वाटेतच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच गिरड व हिंगणघाट येथे सर्वत्र शोककळा पसरली असून नेमका अपघात कशाने झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यासंबंधी पुढिल तपास बुट्टीबोरी पोलिस करीत आहे.

