अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- जिल्हा व सत्र न्यायालयाने एका तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी आज महत्वपूर्ण निकाल पारित केला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने पिडीतेवर बलात्कार प्रकरणी निकाल जाहीर करीत आरोपी संदिप अडबैले वय 26 वर्ष यास 25 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायमूर्ती वर्षा बी. पारगावकर यांनी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संदीप महादेव अडबैले राहणार आंबेडकर नगर यवतमाळ हल्ली मुक्काम सोनेगांव राउत याने दिनांक 6 ऑक्टोबर 2018 दुपारी 3 वाजताच्या सुमारास पिडीतेची आई ही शेतावर मजुरीचे कामावर गेली असतांना घरात कोणी नसल्याच्या संधीचा फायदा घेवुन आरोपी हा पिडीतेच्या घरात जबरदस्ती घुसुन पिडीते सोबत तिच्या ईच्छे विरुध्द जबरी संभोग केला व आरोपीने घटनेची माहिती कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
यासंबधी वडनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी सखोल तपास पुर्ण करुन हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट केले होते. या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील म्हणुन ॲड. दिपक वैदय यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले व त्यांनी शासना तर्फे एकुण 15 सरकारी साक्षदार तपासले व प्रखरपणे बाजु मांडुन युक्तीवाद केला आणि आरोपी विरुध्द गुन्हा साबित केला.
यावेळी तपासी अधिकारी म्हणुन सहायक पोलिस निरीक्षक आशिष गजभिये यांनी तपास पुर्ण करुन आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा केले होते. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पोलिस कर्मचारी भावना गहुकर यांनी सदर प्रकरणात विशेष परिश्रम घेतले.

