श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन 5व्या वेस्टझोन पिंच्याक सिलॅट स्पर्धा 2024 सर्व वयोगटातील मुलामुलींसाठी सेंट पिटर स्कूल पांचगणी येथे आयोजित केली होती
या स्पर्धेमध्ये बीडच्या ऑल बीड जिल्हा पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या वतीने 11 खेळाडू महाराष्ट्र संघात खेळलेे या स्पर्धेमध्ये यजमान महाराष्ट्र गोवा गुजरात दादर नगर हवेली दमन आणि दिव मध्यप्रदेश राजस्थान या विविध राज्यातील 300 खेळाडू सहभागी झाली होती पिंच्याकसिलॅट हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट खेळ प्रकार असून एक सप्टेंबर 2020 पासून या खेळाचा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी 5% राखीव नोकर भरती मध्ये केला आहे या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार भारतीय विश्वविद्यालय संघ अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड ओलंपिक कांऊमिल ऑफ एशियनची मान्यता आहे.
हा खेळ एशियन गेम एशियन मार्शल आर्ट्स गेम एशियन युथ गेम एशियन बीच गेम भारतीय विश्वविद्यालय खेळ अशा ऑफिशियल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळला जातो या खेळाचा समावेश गोवा मध्ये झालेल्या कुल स्पर्धेमध्ये 14 मे 2019 रोजी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन केला अशा खेळांमध्ये आपल्या बीड जिल्ह्याच्या 11 खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राला ऑल बीड जिल्हा पिंच्याक सिलॅट असोसिएशनच्या खेळाडूने खालील प्रकारे मेडल महाराष्ट्राला व जिल्ह्याला मेडल मिळवून दिले.
यावेळी मुलींमध्ये जुनिअर गटात श्रेया देवडकर रोपे पदक, सब जुनियर प्रांजल शिंदे रोप्य पदक , प्रीती शिंदे, वैष्णवी फटाले कास्यपदक मुलांमध्ये सीनियर गटामध्ये ऋषिकेश बेद्रे सिल्वर मेडल, सब जुनियर गटामध्ये, विराट बांगर आर्यन जोगदंड , रोपे पदक निसर्ग असलकर, कास्यपदक मिळवले तसेच अभय वाघमारे, प्रेम जोगदंड, देवांग शिंदे, या खेळाडूंनी सहभाग नोंदवला वरील सर्व खेळाडूंना श्री उत्तरेश्वर जगन्नाथ सपाटे यांचे मार्गदर्शन लाभले वरील सर्व खेळाडूंची राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे सचिव किशोर येवले सर यांनी अभिनंदन केले, डॉक्टर नितीन सोनवणे, एडवोकेट रंजीत वाघमारे, जालिंदर इंगळे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

