पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- शहरात पुन्हा एकदा गांजा तस्करांनी उच्छाद मांडला असून, गांजा व्यापार जोरात सुरू झाला आहे. नागपुर शहरतील नागपुर रेल्वे स्टेशन समोर चाय नाश्ता टप्परीवर खुलेआम गांजा विक्री होते असल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे नागपुर हे गांजा खरेदी-विक्रीचे केंद्र बनल्याचे स्पष्ट झाले आहे.
नागपुर शहरात गांजाची खुलेआम विक्री करून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम शहरात रोज होत आहे. शाळकरी मुलांसहित यात काही अट्टल गुन्हेगारांना गांजा सहज उपलब्ध होऊ लागला आहे. १० ते ५० रुपयांपर्यंत या गांजाची विक्री सर्रास होत आहे. अनेक भागातील मुलेही या नशेच्या आहारी जात आहेत. गांजाची नशा ही पूर्वी गुन्हेगारापुरतीच मर्यादित होती; परंतु आता गांजाची नशा करणाऱ्यांचे लोण पसरत आहे. शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी उपलब्ध होत आहे.
नागपुर शहरतील नागपुर रेल्वे स्टेशन समोर चाय नाश्ता टप्परीवर खुलेआम गांजा विक्री होते असल्याची घटना समोर आली आहे रात्रि 1 वाजताचा सुमारास युवक या टप्परी वर जातात आणि विना कुणाच्या भीती नसल्याचा आव दाखवून गांजाची नशा करतात. बरेच दिवस पासून गणेशपेठ पोलिस स्टेशन आणि बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या या परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा आणि चरस तस्कर यांचा विना कुणाच्या भीतीनी गांजा चरस विक्री करत असल्याची माहिती मिळत आहे. हे सर्व सुरू असताना यावर पाठपुरवा केले असता गांजाची पुडी मिळाली यावरती सीताबर्डी पोलीस स्टेशन आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन यांनी कारवाई केली.

