मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुका हा नक्षलग्रस्त असून संपूर्ण तालुक्यातील लोक हे तालुक्याचे ठिकाण असलेल्या एटापल्ली येते विविध कामाकरीता त्यात बँक, खरेदी विक्री सह इतर शासकीय काम करिता येतात, परंतु गडचिरोली जिल्हा सहकारी बँक एटापल्ली शाखेत कर्मचारी नसल्याने ग्राहकाना नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
दिनांक 08 मे रोजी गडचिरोली जिल्हा सहकारी बँक एटापल्ली शाखेत बुधवार रोजी सकाळ पासून ग्राहकांची खूप गर्दी होती परंतु सदर बँकेत फक्त एक कर्मचारी असल्याने तोच विड्राल, डीपोसिट, लाईट बिल भरणे सर्व जवाबदारी एका कर्मचारीवर असल्याने नागरिकांना तासोनतास उपाशी, एवढ्या उन्हाच्या तडाख्यात उभे राहावे लागले यामुळे ग्राहकांना खूप वेळ रांगेत उभे राहून त्रास सहन करावा लागला. त्यामुळे त्यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
एटापल्ली आधीच आदिवासी बहुल क्षेत्र असून वांगेतुरी मेड्री व इकडे कांदोडी, बर्गी, इतर ठिकाणी वरून नागरिक मोठ्या संख्येने येतात त्यामुळे शासकीय कर्मचारी असे गैरहजर असल्याने ग्राहकांची फसवणूक होत याकडे शासनाने व बँक व्यवस्थापन समूहाने उचित लक्ष घालून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी जेणेकरून नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागणार नाही अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

