रहिवासी क्षेत्रात बिनधास्त टेरेस बार पहाटे पर्यंत असतात सुरू, कारवाई फक्त नाममात्र
पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- पुण्यातील अल्पवयीन बिल्डरपुत्र यानी मध्यरात्री पब मधून निघतांना नशेत कार चालवून दोन जणांना उडविले त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेला कारणीभूत पब व बार संचालक आणि कार चालकांवावर कारवाई व्हावी यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात मध्य रात्री पहाटेपर्यंत सुरू राहणारे अवैध पब, बार, रुफ टॉफ हॉटेल्स वर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.
नागपुर शहरातील रामनगर, वर्धा रोड, रामदासपेठ, धंतोली, लक्ष्मीनगर, सदर, हिंगणा रोड, सीए रोड, सिव्हील लाईन व इतर रहिवासी क्षेत्र मिळून 100 च्या वर रुफ टॉप हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू आहेत. माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या दिशानिर्देश नुसार रात्री टेरेसवर मध्य रात्री पर्यंत म्युझिक, डीजे वाजवता येत नसतांना रहिवासी भागात म्युझिक सोबत मद्यपार्टी सुरु असते माननीय न्यायालयाचे उल्लघंन उघडया डोळयाने सुरू आहे. मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 सुधारित कायद्याचे सर्हास उल्लघंन सुरू आहे.
इमारतीचा नकाशा मंजूर करतांना टेरेस खुलेच असले पाहिजे, त्या ठिकाणी कुठलेही व्यावसायिक बांधकाम करणे आणि व्यवसाय करण्यावर बंदी असून सुध्दा खुले आम टेरेस वर पब, बार, रेस्टॉरेंट, हुक्का पार्लर शहर भर सुरू आहेत. यापैकी अनेकांकडे नगर रचना विभागाची परवानगी नाही, फायर एनओसी नाही, पोलीस परवानगी नाही, जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही, शेजार रहिवासी यांची परवानगी नाही, वाहतुक विभागाची एनओसी सुध्दा नसल्याने महापालिकेचे अधिकारी, नागपुर सुधार प्रन्यासचे अधिकारी, पाेलिस आणि राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांची समिती स्थापन करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपुर शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली आहे.
टेरेस बारला आजपर्यंत उत्पादन शुल्क विभागा कडून परवानगी देण्यात आली नाही, टेरेस वर कोणी बार चालवित असेल तर त्याचा परवाना रद्द होवू शकतो तरी सुध्दा बिनधास्त टेरेस वर मद्यपार्टी, धिंगाणा सुरु असते यंत्रणे कडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते का? पबच्या नावावर हुक्का पार्लरचे प्रमाण वाढले आहे. अनेक इमारतीत पार्किंग नसतांना हॉटेल्स चालविण्याकरीता परवानगी दिलीच कशी यावर कारवाई का होत नाही? रहिवासी इमारतीमध्ये हॉटेल्स सुरू करता येत नाहीत. हॉटेल्स खाली वाहने अवैध प्रकारे लोकांच्या घरासमोर उभे केली जातात याचा मनस्ताप नागरीकांना सोसावा लागतो. शहरात मागील 2 महिण्यात मध्य रात्री पब, हॉटेल्स मध्ये मारपीट झाली आहे. हुडकेश्वर रोड वर खुन सुध्दा झाला आहे. बजाज नगर येथील पबमध्ये मागील महिन्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांनी दारूची बाटली एका व्यक्तीवर फोडल्याचा प्रकार घडला आहे. मद्यधुंत अवस्थेत दारू पिवून वाहने जोरात चालविणे, धिंगाणा करणे अश्या प्रकारे शहरात मध्यरात्री गुन्हेगारांची संख्या वाढत जात आहे यावर पोलिस यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
नगर रचना विभागकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष
शहरातील बहुतांश निवासी इमारतीच्या टेरेसवर पब, रेस्टॉरेंट, हॉटेल्स सुरू आहेत. रहिवाशी इमारतीत विनापरवाना हॉटेल चालविण्याची परवानगी नसून पालिकेच्या नगर रचना विभागकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. इमारतीमध्ये गाळेधारकांनाच पार्किंग उपलब्ध असतांना अवैध हॉटेल मध्ये आलेले ग्राहक रस्त्यावर कुठेही वाहने उभे करून देतात या कारणाने वाहतुक विस्कळीत होत असते, वाहतुक विभागकडून कारवाई केली जात नाही.
शांत झोन मध्ये उशिरापर्यंत म्युझिक व डीजे तालावर धिंगाणा सिव्हील लाईन शांत झोन असून सुध्दा रूफटॉप हॉटेल्स सुरू झाले आहे, रात्रभर म्युझिक सुरू असते, या समोरच वाहुतक विभागाचे ऑफीस आहे, मागच्या बाजुला पालिकेचे ऑफीस आहे, इमारती कडे फायर एनओसी सुध्दा नाही आहे. अनेक ठिकाणी डीजे कर्कश आवाजात सुरु असतो. रात्री 10 वाजताचे नियम धाब्यावर बसविले आहेत. मध्यतंरी टेरेसवरील काही हॉटेलांवर कारवाई झाली होती या नंतर टेरेसवरील हॉटेलांची संख्या मोठया प्रमाणात वाढली याची चौकशी करून नियमबाह्य आस्थापने चालू असतांना डोळेझाक करणार्यांनाही जबाबदार धरायला पाहिजे.
या पत्रपरिषदेला शहराध्यक्ष प्रशांत पवार, महासचिव मिलिंद महादेवकर, उपाध्यक्ष निलिकेश कोल्हे, विदर्भ विद्यार्थी प्रमुख माधुरी पालीवाल, मध्य अध्यक्ष रवि पराते, प्रदेश सरचिटणीस विद्यार्थी राहुल कामळे, युवक प्रदेश सचिव नागेश देडमुठे, उत्तर नागपुर कार्याध्यक्ष कपिल मेश्राम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

