हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढतीत काँगेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचे राज्यातील नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जोरदार पराभव केला.
पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्का देत मतमोजणीत आघाडी घेतली होती. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी मिळाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला मारहानी कारक पराजय सहन करावा लागला आहे.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे राज्यातील नेते, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि माजी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर अशी तुल्यबळ लढत होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या रूपाने कॉंग्रेसचा एकमेव खासदार निवडून आला होता. मात्र, त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. 2024 च्या निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने मंत्री सुधीर सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर लोकसभेच्या मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढलेल्या मतदानाचा फायदा प्रतिभा धानोरकर यांना झाल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

