उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- काल परवा झालेल्या मौसमी पावसामुळे व वाऱ्यामुळे जिल्ह्यातील तसेच शहरातील बऱ्याच नागरिकांच्या घराचे शेतीचे नुकसान झाले अकोला महानगर पालिकेने काही दिवसाआधी लक्झरी स्टॅन्ड येथे चौकाचे सौंदर्यकरण केले होते परंतु काल परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे व वाऱ्यामुळे सौंदर्यिकरणाची पूर्णपणे ऐॆशी तैशी झाल्याचे पहावयास मिळाले.
या चौकात मोठमोठे बगळे व गोलकार गोळे अश्या प्रकारे या चौकाचे सौंदर्यिकरण करून या पत्रकार चौकाला सुंदर रूप आले होते. या सौदर्यीकरणा मुळे हा चौक उजडुन निघाला होता. परंतु काल परवा झालेल्या मुसळधार पावसामुळे हे बगळे व गोलाकार गोळे पुर्णपणे जमिनदोस्त झाले असून या चौकाची पुर्णपणे ऐॆशी तैशी झाली आहे तर या चौकात सौदर्यीकरण च्या तिकोनी आकाराचे लोखंडी पाईप लावले होते. ते पण लक्झरी मुळे तुटले व या सौदर्यीकरणाचे खूप मोठे नुकसान झाले आहे तरी महानगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या चौकाचे पुन्हा सौदर्यीकरण करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

