मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- भारतीय राष्ट्रीय कांँग्रेसचे गडचिरोली /चिमुर लोकसभा निर्वाचण क्षेञाचे उमेदवार डाँ.नामदेव किरसान यांनी भाजपच्या उमेदवाराला जोरदार झटका देत विजयश्री मिळवली.
या लोकसभा निवडणुकीत डाँ.नामदेव किरसान यांना 69- अहेरी विधानसभा मतदार संघातून प्रचंड भरघोष मतदान मिळवुन ते विजयी झाले. यात या क्षेञातील कांँग्रेसचे माजी आमदार पेन्टांरामा तलांडी व माजी जि.परिषद अध्यक्ष अजय ककंडलावार व या क्षेञातील कांँग्रेसचे सम्पुर्ण आजी-माजी पदाधिकारी व कांँग्रेसचे कार्यकर्ते याचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे डॉ.किरसान यांना निवडून आणण्यास आहे.
69-अहेरी विधानसभा क्षेञात बिजेपी उमेदवारासाठी एक मंञी, माजी मंञी व माजी आमदार यांनी फार ताकद लावली तरि सुध्दा या क्षेञातुन कांँग्रेस उमेदवाराला 12000 च्या वर लिड मिळाली, यांचे मुख्य कारण कांँग्रेसचे विरोधी पक्षनेते धडाडीचे नेते विजय वडेट्टिवार यांच्या पाच ही तालुक्यातच झझांवती दौरा व या क्षेञातील कांँग्रेसचे कार्यकर्ते होते. यात प्रामुख्याने या क्षेञाचे माजी आमदार पेन्टांरामा तलांडी व तसेच कांँग्रेस नुकताच पक्षात प्रवेश केलेले माजी जि.प. अध्यक्ष अजय ककंडलावार यांचे सुध्दा फार मोठे योगदान आहे.
या क्षेञात कांँग्रेसचे आजी/माजी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गावा- गावात जावुन कांँग्रेस उमेदवारासाठी प्रचार केला आहे व तसेच काँगेस नेते खासदार राहुल गांधी यांनी या देशात भारत जोडो याञा/न्याय याञा याच्यासुध्दा या क्षेञातील कांँग्रेस कार्यकर्त्या मध्ये मोठया प्रमाणात जोश निर्माण करण्यास मदद झाली. याचेच परिणाम म्हणुन या क्षेञात कांँग्रेसला प्रचंड भरघोष मतदान मिळाले. तरि येणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये हे क्षेञ कांँग्रेसच्या कोट्यामध्ये घेवुन जे कांँग्रेसला या क्षेञात जिवंत ठेवले व कांँग्रेस उमेदवाराला निवडणुन आणले व कांँग्रेस सोबत एकनिष्ठ राहले असे माजी आमदार पेन्टांरामा तलांडी तसेच कार्यकर्ते यांचे फार मोठे योगदान आहे. तरि या क्षेञात आगामी विधानसभे मध्ये उमेदवारी साठी माजी आमदार पेन्टांरामा तलांडी यांच्या नावाची चर्चा आहे.

