मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी/दीक्षाभूमी देसाईगंज येथे परीसरातील सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आले आहे. आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते या सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन करण्यात आले आहे.यावेळी शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
भूमी पूजन केल्यानंतर आमदार कृष्णाजी गजबे यांनी कुदळ मारून कामाचा शुभारंभ केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मारोतराव जांभूळकर पुरूषोत्तम बडोले, संजय नंदेश्वर,इंजि, विनोद मते सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली. इंजि. सुनिल आमटे, डॉ. संजय मेश्राम, प्रकाश बारसागडे सर, तसेच सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज चे पदाधिकारी आयुष्यमती कविता मेश्राम, ममता जांभूळकर सदस्य, ममता नंदेश्वर, गायत्री वाहने, सरीता बारसागडे आदी मान्यवर उपस्थित होते.

