अमरावती जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अमरावती:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका विद्यार्थिनीला शिक्षकाने प्रेमाच्या जाळ्यात ओढत आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोप एका विद्यार्थिनींने केल्याने शिक्षनिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. विद्यार्थिनींने 18 जून रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. अनिकेत अंबादास चव्हाण रा. साईनगर, दर्यापूर असे आरोपीचे नाव आहे.
18 जानेवारी 2023 ते 3 एप्रिल 2024 दरम्यान आरोपी अनिकेत अंबादास चव्हाण यांनी अनेक वेळा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला. त्यानंतर मुलीने 18 जून रोजी दर्यापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी शिक्षक अनिकेत अंबादास चव्हाण रा. साईनगर, दर्यापूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 19 वर्षीय फिर्यादी तरुणी अमरावती येथील एका महाविद्यालयात बीएच्या तृतीय वर्षात शिकत होती. त्यावेळी आरोपी अनिकेत हा सुध्दा पंचवटी चौकातील एका महाविद्यालयात शिक्षक होता. दरम्यान इंस्टाग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्याची आरोपी शिक्षकाशी ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आरोपीने विद्यार्थ्याला त्याच्या दर्यापूर येथील जुन्या घरी नेले. जिथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर मुलीने लग्न करण्याबाबत विचारणा केली असता त्याने नकार दिला आणि शिवीगाळ करून धमकावले. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनिकेत चव्हाण याच्याविरुद्ध विविध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

