Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे राज्य सरकार व केंद्रातील भाजप सरकार विरोधात “चिखल फेक” आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 22, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे राज्य सरकार व केंद्रातील भाजप सरकार विरोधात “चिखल फेक” आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- राज्यातील व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरिब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी, महिला सुरक्षा, खते, बि-बियाणांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलीस भरती, राज्यातील सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालवलेली चालढकल, राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे.

श्रीमंतांची पोर गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या सरकारच्या विरोधात जनतेत तीव्र संताप असून सरकारला जाब विचारण्यासाठी भाजप सरकार विरोधात, इंदिरा गांधी चौक गडचिरोली येते भाजप सरकारच्या प्रतिकृती पुतळ्यावर चिखल फेक करून आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र डॉ. नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी,सचिव,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस विश्वजीत कवासे, शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली सतीश विधाते, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली वसंत राऊत, अ. जा. जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली रजनीकांत मोटघरे, तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी चामोर्शी प्रमोद भगत, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली शंकरराव सालोटकर, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली दत्तात्रय खरवडे, जिल्हासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली सुनील चडगुलवार, महासचिव काँग्रेस कमिटी गडचिरोली देवाजी सोनटक्के, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली संजय चन्ने, रवी मेश्राम, दिवाकर निसार, पुष्पलता कुमरे, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, ममता मेश्राम, नेताजी गावतुरे, हरबाजी मोरे, कुसुम आलाम, छाया कोव्हे, पांडुरंग घोटेकर, प्रफुल आंबोरकर, काशिनाथ भडके, श्रीनिवास तडपल्लीवार, सुरज भांडेकर, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, घनश्याम मुरवतकर, चारुदत्त पोहाणे, माजीत भाऊ, ओमप्रकाश डोंगरे, राजेंद्र कुकडकर, बाबुराव गडसूलवार, उमेश उईके, सुरज मडावी, प्रशांत कापकर, अनुप सिकंदर, भरत येरमे, नंदू वाईलकर, हंसराज उराडे, दिगंबर धानोरकर, कल्पक मोप्पीडवार, चंद्रकांत मडावी, सुदर्शन उंदीरवाडे, भैय्याजी मुद्दमवार, नीलकंठ भांडेकर, लतीफ तोरे, टय्या खान, जावेद खान, अविनाश श्रीरामवार सह जिल्ह्यातील काँग्रेस सह सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

जागतिक योग दिन: शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग आवश्यक: माजी खा. अशोक नेते

Next Post

अकोल्यातील रिधोरा पुलाजवळ भाज्यांनी भरलेली महिंद्रा पिकअप उलटली.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोल्यातील रिधोरा पुलाजवळ भाज्यांनी भरलेली महिंद्रा पिकअप उलटली.

अकोल्यातील रिधोरा पुलाजवळ भाज्यांनी भरलेली महिंद्रा पिकअप उलटली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In