राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- आजपासून महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. याच अधिवेशनादरम्यान राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आणणारी घटना घडली. एकेकाळचे जवळचे राजकीय मित्र असणारे आणि आताचे राजकीय प्रतिस्पर्धी असणारे दोन नेते एकत्र येत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. उद्धव ठाकरहे हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.
मुंबई येथील विधिमंडळात अधिवेशनासाठी जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या दोघांनी एकाच लिफ्टमधून प्रवास केला आहे. प्रविण दरेकर देखील यावेळी लिफ्टमध्ये जाणार इतक्यात उद्धव ठाकरे यांनी आधी प्रवीण दरेकरांना बाहेर काढा, असं विधान केलं. आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले तर चर्चा तर होणारच… उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या ‘लिफ्ट’ भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.
फडणवीस- ठाकरे लिफ्ट’ भेटीची काय घडलं?महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर सभागृहात जाण्यासाठी विधिमंडळातील लिफ्टजवळ उभे होते. याचवेळी त्या लिफ्टजवळ माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर पोहोचले. मग हे सगळे नेते एकत्र लिफ्टने सभागृहात जाण्यासाठी निघाले. उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीस हे लिफ्टमध्ये गेले. इतक्यात भाजपचे नेते प्रविण दरेकर हे त्या लिफ्टमध्ये जाऊ लागले. मात्र इतक्यात ‘याला आधी बाहेर काढा’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया? याला आधी बाहेर काढा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यावर प्रविण दरेकरांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्रजी आणि उद्धवजी, तुम्ही दोघं एकत्र जाणार असाल. तर मी बाहेर जातो, असं प्रविण दरेकर म्हणाले. पण तुमच्या दोघांमधला संवाद मी बाहेर सांगणार नाही, असंही प्रविण दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे तरिही त्यांच्या विधानावर ठाम होते. आधी तू बाहेर जा, असं उद्धव ठाकरे प्रविण दरेकरांना म्हणाले आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.

