अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर २७ जुन:- सावनेर शहरात मोकाट गुरांची समस्या मोठी आहे. अगोदरच रहदारीसाठी डोकेदुखी ठरत असताना त्यात शहरात गायी आणि गुरांचे रस्ता रोको आंदोलन वाहतुकीस अडसर ठरत असल्याने मोकाट गुरांच्या त्रास वाढल्याचे दिसत आहे. त्यांचा स्थानिक नगर परिषद प्रशासनच्या माध्यमातून बंदोबस्त केला पाहिजे आणि गुरांच्या मालकांना नगरपरिषदेकडून नोटीसा देण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे फिरताना दिसतात त्यामुळे नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागते. मुख्य मार्ग आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर तसेच चौकात गुरे कळपाने फिरतानाचे दृश्य कुठेही दृष्टीस पडते त्यात गायीचे प्रमाण जास्त आहेत शहरात रस्त्यावर कळपाने फिरतात. चौकात तसेच राम गणेश गडकरी निवासस्थाना समोर भाजीपाला विक्रेते उरलेला भाजीपाला तेथे फेकत असल्याने येथे जनावराची गर्दी होते. बस स्टॅन्ड ते गांधी पुतळ्यापर्यंत तिथून शिवाजी महाराज चौकापर्यंत या मोकाट गुरांच्या मुक्त संचार आढळून येतो.
रस्त्यावर अगोदरच वर्दळीच्या प्रमाण मोठे असल्याने मुख्य चौकात सकाळ संध्याकाळ वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार होतात त्यातच ही जनावरे रस्त्यावर चालतात बऱ्याचदा रस्त्यावरच्या कडेला चौकात बसून असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यांना टाळून जावे लागत असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यांना हट्टविणे ही यावेळी मुश्किल होते.त्यामुळे शहरात कोणत्याही ठिकाणी गेल्यास हे गुरे दिसून येतात. गांधी चौकात सकाळी मोकाट गुरांनी आंदोलन केले. गुरांच्या या कळपामुळे रहदारीला तसेच वाहन चालकांना अडचणीच्या सामना करावा लागत आहे.
स्थानिक प्रशासनाने मोकाट गुरांवर कारवाई करण्यात येऊन गुरांना कोंडवाड्यात कोंडून गुरांच्या मालकांना दंडही ठोठावण्यात आला पाहिजे. या गंभीर बाबीकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.प्रशासन मोठी घटना होण्याची वाट तर बघत नाही ना? मोकाट गुरांच्या बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

