उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली संजय नगर संस्थेच्या वतीने लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे यांनी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याबदल आणि योगदानाबद्दल आपले विचार व्यक्त केले. एकदा एक ज्योतिषी.. शाहू महाराज यांचे कडे आला आणि म्हणाला राजे हात दाखवा तुमचे भविष्य सांगतो .. महाराजांनी पोलीस अधिकाऱ्याला सांगितले दूरवरून आलेत हे आज मुकामी… यांचा सत्कार करा. उद्या बोलू दुसऱ्या दिवशी ज्योतिषी दरबारी येऊन म्हणाला की मला तुमच्या माणसांनी खूप मारले महाराज म्हणाले तुम्हाला घरून निघताना तुमचे हे भविष्य कळाले कसे नाही आज मार पडणार आहे ज्याला स्वतःच भविष्य माहित नाहीत नाही तो माझं भविष्य काय सांगणार भविष्य मनगटात असत हाताच्या रेषेवर नाही.. आश्या या कल्याणकारी लोक राजाला जयंती निमित्त मानाचा मुजरा.
बौद्ध धम्म संस्कार संघ सांगलीच्या वतीने दिनांक 26 जून रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. प्रा. सुनीता बोर्ड मॅडम यांनी शाहू महाराजांचे कार्य व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली संस्थेच्या वतीने 10 वी व 12 वित उतिर्न विद्यार्थी, पदवीतर स्पर्धा परीक्षा व शासकीय …इतर ठिकाणी यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवंतिका वाघमारे यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय धम्म कीर्ती यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माने सर स्वागत पर. अध्यक्षीय भाषण डॉ. सुधीर कोलप यांनी केले. आभार प्रदर्शन शैलजा साबळे यांनी मानले या कार्यक्रमास सर्व संचालक, सभासद, उपासक उपासीका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

