हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.9:- आम आदमी पार्टी बल्लारपुर शहर समिती तर्फे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल वाघ यांना एक निवेदन देण्यात आले ज्यामध्ये बल्लारपूर शहरातील टेकडी, डेपो आणि बस्ती विभागातील सार्वजनिक शौचालयांची लवकर दुरूस्ती करून त्यांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे व गांधी संकुल, स्मशानभूमी, कारवा रोड आणि केजीएन मस्जिद परिसरातील शौचालयाकडे लक्ष द्यावे आणि पावसाची सुरुवात झाली आहे आजू बाजू परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे अशी मागणी शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश्वर गंडलेवार, शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, गणेश सिलगमवार, शहर प्रवक्ता आसिफ शेख, शहर महिला अध्यक्षा किरण खन्ना, रेखा भोगे व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

