मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दि. 14 मार्च 2023 रोजी तक्रारदार नामे राहुल डोंगरे राहणार लाडकी यांना सोबत जिमा टॅक्स कंपनी वनी येथे सोबत काम करत असलेला आरोपी राजेश शर्मा राहणार इंद्रावास कॉलनी छिन्नवाडा मध्यप्रदेश याने दवाखान्यात जातो असे सांगून तक्रारदार यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल ही घेऊन गेला होता परंतु तो मोटार सायकल घेऊन परत आला नाही.. अशा तक्रारदाराच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद होता.
सदर गुण्यातील तपासी अधिकारी पोहवा प्रवीण बोधाने, नरेंद्र डहाके पो.शी.संदीप उईके यांनी सायबर सेल वर्धा येथे कार्यरत असलेले अनुप कावळे, गोविंद मुंडे यांच्या तांत्रिक मदतीने राज्य राजस्थान येथील जिल्हा बंसवाडा येथे जाऊन तेथे आरोपीच्या शोध घेऊन राजेश शर्मा यांना ताब्यात घेतले. आरोपीने मित्राचा विश्वासघात करून तक्रारदार डोगरे यांची घेऊन गेलेली मोटर सायकल ही हिंगणघाट पोलिसांनी आरोपी राजेश शर्मा याचे जवळून हस्तगत करून ती जप्त केली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट रोशन पंडित, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मनोज गभने ठाणेदार हिंगणघाट याचे निर्देशा प्रमाणे ,पोहवा नरेंद्र डहाके, प्रवीण बोधाने, पो. काँ. संदीप उईक, भूषण भोयर, महेंद्र गायकवाड, यांनी केली.

