उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोर:- येथील ऐतिहासीक दिक्षाभुमी स्मारक येथे भोर तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील इयत्ता पहिली ते पदवीधर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने दिनांक 14 जुलै रोजी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
1937 साली भोर – खेड मतदार संघाचे रिपब्लिकन फेडरेशनचे खासदार बाळासाहेब साळुंखे यांनी भोर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत परिषद घेतली होती. त्यानंतर 1958 साली भैय्यासाहेब आंबेडकर, खासदार बाळासाहेब साळुंखे, खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड, खासदार क्रांतीसिंह नाना पाटील (पत्री सरकार), खासदार जी के माने, भदंत महास्थवीर, भिक्खु वातानबे, यांच्या उपस्थितीत धम्मदीक्षा सोहळा पार पाडला त्यानंतर काही वर्ष ती जागा समाजाला बैठका घेणे, कार्यक्रम घेणे यासाठी वापरात होती.
त्याच कालावधीत भोरमध्ये नगर परिषदेची स्थापना झाली. काही कालावधीनंतर समाजाचे त्या जागेकडे दुर्लक्ष झाले आणि मोक्याची रिकामी जागा म्हणुन ती जागा नगरपरिषदने क्रीडा संकुलासाठी आरक्षित केली आणि एक सभागृह बांधले पण काही जुन्या जागरुक बौध्द नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि त्या बांधकामाला स्टे देण्याचा आग्रह धरला. मग अनेक वर्ष अर्धवट ईमारत तशीच उभी होती, तमाशाचे फड, राव्हटी आणि दारुच्या अड्डयाचे ते केंद्र बनले. 1996 – 97 मधे पुन्हा भारीप च्या कार्यकर्त्यांनी त्या जागेसाठी लढा उभा केला तहसील कार्यालयासमोर 48 दिवस आरक्षण हटवुन जागा ताब्यात द्यावी म्हणुन बेमुदत आंदोलन केले त्या आंदोलनात आजच्या कार्यक्रमाच्या आयोजक आयु. सुनंदा ताई गायकवाड सहभागी होत्या. बर्यापैकी समाजात जागृती झाली आणि पुढे खासदार बाळासाहेब साळुंखे यांचे सुपुत्र कश्यपदादा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन केली.
स्थानिक आमदारांना आमदार निधीतुन स्मारक बांधुन द्यावे म्हणुन संपुर्ण भोर तालुक्याने मागणी केली. तमाम बौध्द समाजाच्या या मागणीचे स्वागत करुन आमदार संग्रामदादा थोपटे यांनी ते स्मारक बांधुन दिले. या स्मारकाचे उद्घाटन भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भिमराव आंबेडकर यांच्या हस्ते तालुक्याचे आमदार संग्रामदादा थोपटे, बार्टीचे तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले. या समितीवर तालुक्यातील शिक्षीत, सुशिक्षित आणि सामाजिक बांधिलकी असणारे लोक निवडुन दिले त्यामध्ये महीला सदस्य म्हणुन सुनंदा गायकवाड आहे. ताईंच्या विनंतीस्तव सदर शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. अशा जागेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तीनही पिढ्यांची पावलं लागलेली आहेत म्हणुन भोर तालुक्याचे अस्मितास्थान आहे.

