प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागभीड:- आज दिनांक 14 जुलै 2024 रोजी चिमूर गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. नामदेवरावजी किरसान यांचे वाढदिवसा निमित्त तालुका कांग्रेस कमिटी व शहर कांग्रेस कमिटी नागभीडच्या वतीने ग्रामिण रुग्णालय नागभीड येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.
यावेळी नागभीड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी, नागभीड शहर अध्यक्ष किशोर समर्थ, काँग्रेस जेष्ठ नेते डॉ. मोहन जगनाडे, नागभीड शहर युवक कांग्रेस अध्यक्ष महेश कुर्झेकर, नागभीड तालुका उपाध्यक्ष रवींद्र बळी, नागभीड अल्पसंख्याक काँग्रेस तालुकाध्यक्ष तबरेज शेख, प्रा. डॉ. संदीप सातव, रामदास हेमने, पारस नागरे, समीर पातेवार, हरीश मुळे सुरज चौधरी, नितीन ठाकरे, प्रमोद उंबरकर, दर्शन कुंभरे, नरेश पानसे सोबतच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

