अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील सातेफळ येथिल ज्ञानदा हायस्कुल, ज्युनिअर सायन्स कॉलेज व शहरातील पर्यावरण संस्थेच्या वतीने १६ जुलै रोजी शहराच्या मुख्य मार्गाने वृक्ष दिंडी काढून वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण, वृक्षसंगोपण यांच संदेश देणारे फलक हाती घेतलेल्या विद्यार्थ्यांनी याबाबत घोषणाबाजी केली.
आज मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड हे भविष्यात मानव जातीला विनाशाकडे घेऊन जाणारी आहे. भविष्यातील विनाश रोखण्यासाठी आजच वृक्षारोपन करून अधिकाअधिक झाडे जगवली पाहिजे ही जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जागृती करण्यात आली.
यावेळी शहराच्या प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेली दिंडी चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड सुधीर कोठारी यांनी त्यांच्या निवास स्थानासमोर वृक्षदिंडी चे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. वृक्ष दिंडीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

