राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- ठाणे येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एक तरुणीने शेजारी देश असलेल्या पाकिस्तानात जाऊन लग्न केलं. त्यानंतर ती परत ठाणे येथे परत आली याची माहिती मिळताच पोलिसानी या तरुणीला बेड्या ठोकल्या आहे. ठाण्यातल्या वर्तकनगर पोलिसांनी या महिलेला ठाणे कोर्टात हजर केलं असता न्यायालयाने तिला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या तरुणीवर बनावट कागदपत्र तयार करून पाकिस्तानमध्ये गेल्याचा आरोप आहे. या महिलेला बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या आधार केंद्राच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?: शेजारी देश असलेल्या पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण देशभरात गाजलं. पण आता ठाण्यातली एक महिला थेट पाकिस्तानात पोहोचली आणि तिथं एका पाकिस्तानी तरुणाशी लग्नही केलं. त्यानंतर सनम खान नावाची ही महिला गेल्याच आठवड्यात पुन्हा भारतात परतली.
सोशल माध्यमातून ओळखीतून पाकिस्तान मधील एका तरुणाशी सनम खानचं प्रेम जुळलं त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नासाठी तिनं थेट पाकिस्तानमधलं एबोटाबाद गाठलं. पण महत्वाची बाब अशी की पाकिस्तानात जावून दुसरं लग्न करण्याआधी या महिलेचं आधीही लग्न झालं होतं, पण तिचं पहिलं लग्न मोडलं होत.
पाकिस्तानात जावून दुसरं लग्न केल्यानंतर 17 जुलैला ही महिला पुन्हा भारतात आली. ठाण्यातल्या तिच्या आईच्या घरी पोहोचली, पण ठाणे पोलिसांना हे सगळं प्रकरण संशयास्पद वाटलं आणि त्यांनी महिलेला चौकशीसाठी बोलवून घेतलं. या प्रकरणात आणखी एक महत्वाची बाब अशी की पाकिस्तानला जाण्यासाठी सनम खाननं जी कागदपत्र बनवली होती त्यावेळी नावातही फेरफार केला होता. गॅझेट तयार करुन जुनं नाव बदललं आणि सनम खान हे नवं नाव धारण केलं. इतकंच नव्हे तर त्यावरुन आधार आणि पॅन कार्डही बनवलं.
या महिलेनं सांगितलं की, मी पुन्हा पाकिस्तानला जाणार असल्याचं म्हटलंय. पण पोलीस सनम खानची कसून चौकशी करत आहेत, तिची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. आणि फसवणुकीसह बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे चौकशीत आणखी काय समोर येतंय, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

