रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- आष्टी पाथरी रस्त्यावर विनानंबरची कार आडवी लावून लुटमार करणाऱ्या टोळीच्या आष्टी पाथरी व मानवत पोलिसांनी आज पहाटे मुस्क्या आवळल्या आष्टी पाथरी रस्त्यावर काहीजण विना नंबरची कार रस्त्यात आडवी लावून वाहने थांबवत शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करीत असल्याची माहिती आष्टी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांना काल पहाटे मिळाली होती त्यानुसार श्री ईगेवाड यासह सहाय्यक फौजदार गोपीनाथ कांदे पोलीस शिपाई विनोद वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली असता आष्टी पाथरी रस्त्यावर परभणी जिल्ह्याच्या हद्दीत डोंगरगाव शिवारात लुटमार सुरू होती. यावेळी पोलिसाची गाडी पाहताच चोरट्यांनी पाथरीच्या दिशेने धूम ठोकली या प्रकारची तात्काळ माहिती पाथरी व मानवत पोलिसांना कळवून तात्काळ नाकाबंदी करण्यास सांगण्यात आले.
दुसरीकडे आष्टी पोलिसांकडून लुटमार करण्याचा पाठलाग सुरूच होता ही कार मानवत जवळ पकडून चौघाच्या शास्त्रासह मुसक्या आवळण्यात आल्या. शैलेश कारभारी भोसले, सतीश रामभाऊ चव्हाण हे दोघे राहणार लिंबा, तालुका पाथरी आणि सोनूसिंग पुनसिंग टाक, जितेंद्रसिंग अवतारसिंग जुनी राहणार परभणी अशी या चौघांची नावे आहेत. हे चौघेही रेकॉर्डवरील गुन्हेगारी असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इगेवाड यांनी दिली.

