कसनसुर – हालेवाऱ्याच्या मुख्य रस्त्यावर लावले खांब, एखादी दुर्घटना घडली तर जगणार काय महावितरण.
विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- तालुक्यातील कसनसुर ते हालेवारा या गावाच्या मुख्य रस्त्यावरचे लोखंडी खांब तुटल्याने लाकडाचा खांब तयार करून सरड लाकडी खांबाला विद्युत प्रवाह जोडल्याने पुन्हा एकदा महावितरणचा काम चव्हाट्यावर आला असून अक्षरशः येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात अति मूसळधार पावसाने हजेरी लावून थैमान घातले होते यात अनेक रस्ते पूल झाडे,आणि अनेक घरांची पडझळ झाली यात कसनसुर ते हालेवारा या रस्त्यावर अनेक झाडे पडून विद्युत खाम्ब तुटून पडले त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित झाला होता
परंतु कसनसुर हालेवारा रस्त्यावर चक्क लोखंडी खांब ऐवजी लाकडाचा विद्युत खांबाला तारे जोडून 11 केव्ही वीज वीज पुरवठा दिल्या जात आहे सदर खांब रस्त्याच्या बाजुला आहे व रस्त्याने रोज शेकडो नागरीक तालुक्याला ये जा करीत असतात अशा वेळी लाकडी खांब कोसळला तर मोठा अनर्थ होऊ शकतो.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून या मार्गावर जंगली प्राणी गुरे फिरत असतात त्यामुळे अनेक जंगली प्राणी आणि गुरे दगावण्याची दाटशक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे लाख मोलाचा जिव गेल्यानंतर लोखंडी खांब लावणार काय ?असा खडा सवाल येथील नागरिकांकडुन केला जात आहे त्यामुळे लाकडी विद्युत खांब ताबडतोब बदलण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे
मयूर गोहणे कनिष्ठ अभियंता महावितरण कसनसुर
मागच्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे विद्युत खांब कोसळले त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता दरम्यान नागरिकांच्या मागणी नुसार वीज पुरवठा सुरळीत राहण्याकरिता तात्पुरता लाकडी खांब लावला आहे.

