मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्यावतीने दिनांक 7 ऑगस्टला घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत भारत विद्यालयाच्या 14 वयोवर्ष गटातील चमूने भवंन्स विद्यालयाचा पराभव करित तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. व आपले स्थान जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निश्चित केल.
या फुटबॉल संघात नैतिक सतिश येलेकर, अर्थव पुंडलिक महाजन, धिरज पिंटु साहानी , क्रिश विश्वंभर सोनटक्के, पुर्वेश विनोद तपासे, यश प्रविण बोंडे, आराध्या राजु थुल, रोहन पप्पु किन्नाके, जय विलास ठाकरे,अर्थव विनोद वाटमोडे, वेदांत दिनेश भोयर,मोहित गजानन राउत, समर्थ मंगेश हरेल, नक्ष दशरथ पोहाणे, दिशांत गजानन बारकर यांनी सहभाग घेतला.
मिळालेल्या या यशाबद्दल प्रोग्रेसिव्ह अेज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोकुलदास राठी, सचिव रमेशराव धारकर, उपाध्यक्ष श्यामभाऊ भीमणवार संस्थचे सर्व संचालक सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक रा. ता. कारवटकर, उपमुख्याध्यापक हरिष भट्टड, पर्यवेक्षिका निलांक्षी बुरिले, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, क्रीडा शिक्षक विनोद कोसुरकर, संदिप चांभारे, कु.संजना चौधरी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

