अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर व शिक्षण विभाग, जिल्हा परिषद वर्धा द्वारा तालुकास्तरीय अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आवाहने या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात डाॕ. बी. आर. आंबेडकर विद्यालयाची वर्ग दहावीची विद्यार्थीनी कु.नंदिनी प्रवीण टापरे या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक प्राप्त करून तीची जिल्हास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यासाठी निवड झाली.
जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळावा नुकताच वर्धा येथे संपन्न झाला. या विद्यार्थी विज्ञान मेळाव्यात आयोजित परिसंवादात नंदिनी प्रवीण टापरे या विद्यार्थीनीने सहभाग नोंदवून कृत्रिम बुद्धिमत्ता : संभाव्यता व आवाहने या विषयावर उत्कृष्ट भाष्य केले. त्याबद्दल जिल्हा परिषद वर्धा, शिक्षण विभागाने तिला सहभागाचे प्रमाणपत्र देऊन गौरवान्वित केले.नंदिनीच्या या यशाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत जवादे, सचिव अनिल जवादे, मुख्याध्यापक डाॕ.चंद्रकांत नगराळे, उपमुख्याध्यापक सुनिता खैरकार, पर्यवेक्षक दिनेश वाघ, रविंद्र शिरपूरकर, विलास भोमले आणि सर्व शिक्षकांनी नंदिनीचे अभिनंदन केले.

