अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात कारंजा चौकात राष्ट्रीय क्रांती दिन तथा जागतिक आदिवासी दिनोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून हिंगणघाट पं स माजी सभापती वासुदेवराव गौळकर, तर प्रमुख अतिथी युवक बिरादरीचे वर्धा जिल्हा प्रभारी अशोक सोरटे, माजी सैनिक कल्याण संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक बकाने, पत्रकार प्रभाकर कोळसे, भारतीय युवा संस्कार परिषदेचे प्रदिपकुमार नागपूरकर यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते महात्मा गांधींच्या पुतळ्यास व बिरसा मुंडा यांचे प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. याप्रसंगी युवक बिरादरीचे अशोक सोरटे यांनी क्रांती दिनाच्या इतिहासावर प्रकाश टाकला. आपल्या अध्यक्षीय भाषणात वासुदेव गौळकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शुर वीरांच्या स्मृतीस उजाळा दिला. याप्रसंगी शहरातील माजी सैनिक महेश गंधारे, प्रकाश ढेकले, पत्रकार तथा भारतीय युवा संस्कार परिषदेचे संस्थापक प्रदिपकुमार नागपूरकर, अब्दुल कादीर बक्क्ष, प्रभाकर कोळसे यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते शाल, श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे संचालन युवक बिरादरीचे अशोक सोरटे यांनी तर माजी सैनिक कल्याण समिती चे अध्यक्ष पुंडलिक बकाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास तेलंग, विजय बाकरे, रमेश जुवारे, प्रकाश पाके, नरेश बुल्ले, मडावी, अंकुश सोनकुसरे, शर्मा ताई, जेष्ठ पत्रकार विजय राठी, सतिश वखरे, प्रज्ञा तितरे, वैशाली निमजे, वैशाली नंदनवार, पुनम ढगे, संतोषी धर्मेंद्र ढगे, चेतन काळे, प्रशांत चाफले, सुभाष माडेवार, यांची उपस्थिती होती.

