मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन देसाईगंज:- दिक्षाभुमी देसाईगंज येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सम्यक जाग्रूत बौध्द महीला समीती दिक्षा भूमी देसाईगंज येथे आज दि.15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना निमित्त सकाळी पूज्य भन्तेजी प्रज्ञारत्न यांच्या उपस्थितीत बूध्द वंदना घेऊन व ज्ञानाचे महासागर प्रज्ञासूर्य परमपूज्यनीय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती अपार श्रद्धा व्यक्त करून 7-45 वाजता राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.व राष्ट्रगीत गाऊन भारतीय संविधान ऊद्देशीकाचे वाचन करण्यात आले.
त्याचप्रमाने दिक्षा भूमी येथे नीत्य सूरू असलेल्या उपक्रमाविषयी माहीत सांगण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी समीतीच्या सचीव ममता जांभूळकर, अध्यक्ष कवीता मेश्राम, गायत्री वाहने, लीना पाटील, यशोदा मेश्राम, समतादूत डाॅ.वंदना धोंगडे, रश्मी गेडाम, ममता रामटेके, प्रतीभा बडोले, आशा रामटेके, ममता नंदेश्वर, त्याचप्रमाणे मारोती जांभूळकर, पवन गेडाम, सूरज लींगायत, बोरकर सर, बडोले सर व ईतर सर्व उपासक व ऊपासीकांच्या उपस्थीतीत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

