भारत बंदशी संबंध नसल्याचेही केले स्पष्ट, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत व समर्थनार्थ काढणार भव्य मोर्चा.
अर्पित वाहाणे आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- अनुसूचित जाती मध्ये अ. ब. क. ड. वर्गीकरण देऊन सुप्रीम कोर्टाने उपेक्षिताना न्याय दिला व संविधानाचा खरा सन्मान झाला म्हणून येत्या 10 सप्टेंबर ला सुप्रीम कोर्टाच्या निर्णया समर्थनात हजारोच्या संख्येने अभिनंदन रॅली काढू. अशी घोषणा उपेक्षित हिंदू दलित संघर्ष समिती यांनी आज दिनांक 22 ऑगस्ट रोज गुरुवारला आर्वी येथे केली.
सकल उपेक्षित हिंदू दलित संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानी तहसीलदार हरीश काळे यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालय दिल्ली व प्रधानमंत्री भारत सरकार यांना अभिनंदन पर निवेदन पत्र पाठवलेलं आणि नुकताच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या 7 न्यायमूर्तीच्या खंडपिठाणे 01 ऑगस्ट 2024 ला अनुसूचित जाती अ. ब. क. ड. वर्गीकरनाच्या बाजूला निर्णय दिल्यामुळे, वंचीत उपेक्षित हिंदू दलित त्यात मख्यत्वये, वाल्मिकी समाज, खाटीक समाज, मांग समाज, चर्मकार समाज, ह्याला मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी, दार उघडे झालेले आहे, आणि यासाठी प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या कडुन आरक्षण टिकणारा मजबूत ड्राफ्ट सादर करण्यात आला.
आरक्षण असून देखील सदैव वंचित असलेला उपेक्षित हिंदू दलित जातीची बाजू मांडण्यासाठी अधिवक्त्यांची मजबूत सक्षम टीम उभी केल्या बद्दल भारत सरकारचे सुद्धा समितीच्या वतीने अभिनंदन आभार मानन्यात आले. यावेळी समितीच्या वतीने खालील विषय विशद करण्यात आले.
अनेक वर्षांपासून सुरु असलेला न्यायिक लढा लढल्या नंतर हिंदू दलित समाजातील प्रमुख घटक ज्यांना आरक्षणाचा फायदा मिळत नव्हता त्यांना आता त्यांच्या जात निहाय संखेच्या आधारावर अ. ब. क. ड वर्गीकरण झाल्यामुळे फायदा होईल हा एकच उत्साह उपेक्षित हिंदू दलित संघर्ष समिती च्या वतीने अभिनंदन पर निवेदन पत्रात नमूद केला असून, विशेषतः काल झालेल्या भारत बंद आंदोलनाशी आमचा काहीही संबंध नसल्याचे उपेक्षित हिंदू दलित संघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट केले असून, येत्या 10 सप्टेंबर रोज मंगळवार ला हजारो च्या संख्येने उपेक्षित हिंदू दलित एकता संघर्ष समितीच्या वतीने अभिनंदन रॅली काढण्यात येणार असल्याचे सुद्धा पत्रात नमूद असून सकल उपेक्षित हिंदू दलितांना व अ.ब.क ड वर्गीकरनाच्या समर्थनात असलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या नागरिकांना सामील होण्याचे आवाहन केले.
यावेळी समितीचे संयोजक दिलीप पोटफोडे, हेमंत चावरे, संदेश सारसर, विजय वाघमारे, कुणाल माकोडे, करण सारसर, मंगेश प्रधान, निलेश बंगाले, गौरव कुऱ्हेकर, समिती नीती मार्गदर्शक समाज भूषण राजेश अहिव, राजानंद वानखडे, सुधाकर वाघमारे, दिगंबर मुंगले,निमंत्रक कमलेश लोखंडे, गुणवंत प्रधान, अंकुश लांडगे, अनिल वानखडे, गजानन रा. वानखडे, हरी प्रधान, अनिल वानखडे युथ संयोजक कुणाल वानखडे, अजय वानखडे, धीरज शिंदे, कुणाल लांडगे यश प्रधान ऋषिकेश गायकवाड, सचिन प्रधान, तेजस गायकवाड, अनुप वानखडे, संदीप प्रधान, मनोज प्रधान, अरुण ग. लांडगे, सतीश खंडारे, संजय वानखडे आदि उपस्थित होते.

