हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात शालेय विद्यार्थीनींच्या अत्याचाराची घटनेचे पडसाद उमटत असताना त्यात अजून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करणारी चंद्रपूर जिल्ह्यात एका युवतीवर सामुहिक बलात्कार घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हात एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपुरमध्ये एसटी बस स्टँडच्या प्रसाधनगृहात एका युवतीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. यामुळे राज्यात महिला आणि मुली किती सुरक्षित आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत कायद्याचा धाक कोणाला राहिला आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हातील नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. 12 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेचा आरोपीच्या मित्रांनीच व्हिडिओ काढला आहे. यामुळे किती विकृती वाईट झाली असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. घटनेनंतर नागभीड शहरातील भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.
सोबतच आरोपीना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला. पोलिसांनी व्हिडीओची तपासणी करून विविध पथके गठीत करत मुलीचा मग काढला. सोबतच घटनेत सामील सर्व 5 आरोपींना 3 तासात ताब्यात घेतले. त्यांची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
पोलीस अधिक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक नागभीड येथे दाखल झाले. या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. याबाबत पोलिसांनी कारवाईचे आदेश दिले असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपी कोणीही असला तरी त्याला वाचवू नका असेही त्यांनी सांगितले.

