विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली दि.२७:- श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त समर्पण ट्रस्ट तर्फे समस्त एटापल्ली वासीयांनसाठी महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्य नागरिकांनी या महाप्रसाद वितरणाचा आस्वाद घेतला. समर्पण संस्थेने केलेल्या उपक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी तोंड भरून कौतुक केले.
या महाप्रसाद वितरण कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी राघवेंद्र सुल्वावार अध्यक्ष, राहुल कुळमेथे उपाध्यक्ष, अमोल गजाडीवार सचिव, रोहित बोमकंटीवार सहसचिव, संपत पैडाकुलवार कोषाध्यक्ष, सुरज मंडल सहकोषाध्यक्ष तसेच सदस्य संतोष गंधेशिरवार, अंकित दिकोंडवार, आदित्य चिप्पावार, महेंद्र सुल्वावार, प्रणय कासवटे, भाग्यश्री शेंडे, शैलेश आकुलवार, साहिल हमंद यांनी सहकार्य केले.

