प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:-स्थानीय संत कबीर वार्ड चे निवासी श्री हरिभाऊ ढाले यांचे वीर पुत्र भारताची पहिली सुरक्षा लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय सीमा सुरक्षा बल मध्ये 2003 ला नियुक्त झाले होते. दहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण प्राप्त करून त्यांची पहिली तैनाती व्हीव्हीआयपी एरिया दिल्ली येथे झाली होती. 20 वर्षा अगोदर आजच्या दिवशी 07 सप्टेंबर 2004 रोजी त्यांना वीरगती त्यांना प्राप्त झाली. देश सेवेच्या त्यांच्या कार्याची आठवणीत पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट तालुका तर्फे शहीद प्रकाश ढाले यांना श्रद्धाजली वाहण्यात आली.
या श्रद्धाजली कार्यक्रमात पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट तहसील के अध्यक्ष: विलास भोयर, कोषध्यक्ष: सागर दाते, सचिव: राजू साटोने, संपर्क प्रमुख: अमोल पवार, नितेश लाचारवार, सुनील निमजे, अशोक खोडे, पाधुरंग धनविज, सतीश दुधे, योगेश मसराम, दत्तू सातपुते, श्रीकांत फलके सह संत कबीर वार्ड येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

