राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- ॲड. वामनराव चटप यांचे नेतृत्वात राजुऱ्यात हजारो युवकांची भव्य बाईक रॅली भवानी माता मंदिर ते बोंडे मंगल कार्यालय राजुरा अशी बाईक रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण केले. यात हजारो युवक सहभागी झाले होते.
विशेष म्हणजे १८ ते ३० वयोगटातील युवकांची मोठी उपस्थिती बाईक रॅलीमध्ये होती. संपूर्ण राजुरा शहरातील बाजारपेठ घोषणांनी निनादून गेली. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार १००० हुन अधिक बाईक्स या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. गेल्या ४५ वर्षापासून या क्षेत्रात सक्रिय असलेल्या शेतकरी संघटना चळवळीत आता केवळ ज्येष्ठ दिसतात आणि युवक दिसत नाही असे बोलणाऱ्या विरोधकांना या बाईक रॅलीत सक्रिय सहभागी हजारो युवकांनी उत्तर दिले. स्थानिकांना रोजगार व शैक्षणिक क्षेत्रात उन्नती यातून युवकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी युवकांनी जाती-धर्म-पक्ष आदी भेदा पलीकडे जाऊन एकदा ॲड. वामनराव चटप यांना आमदार करण्याचा संकल्प केला आहे.

