पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीतून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथे रविवारला पहाटेच्या सुमारास एका पोलीस उपनिरीक्षकाला एका कार चालकाने मारहाण केल्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक असलेले अनंत गरमोडे हे रात्री उशिरा गस्तीवर असताना त्यांना एक कार दिसली कारच्या काच काळ्या रंगाचे होते. यावेळी त्यांनी कार चालकाला दरवाजा उघडण्या बाबत सांगितले. त्यानंतर कार चालक गाडीतून बाहेर आला आणि त्याने पीएसआय गरमोडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीचा पोलिस अधिकाऱ्याशी जोरदार वाद सुरू असताना कारमधील एक महिला पळून गेली. यादरम्यान कार चालकाने पोलीस उपनिरीक्षक गरमोडे यांना मारहाणही केली.
तसेच व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडली. त्यानंतर घटनास्थळी इतर पोलीस अधिकारी दाखल झाले. त्या व्यक्तीला पोलिस स्टेशन मध्ये नेण्यात आले. नंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर एका राजकीय नेत्याने पोलीस स्टेशन मध्ये फोन केल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.

