मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.०२ ऑक्टोंबर:- वर्धा लोकसभेचे खासदार अमर काळे यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सत्कार कार्यक्रम प्रसंगी उपस्थित झाले असता. या कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश धोबे यांच्या नेतृत्वात खासदार अमर काळे यांची केंद्रीय शिक्षण, महिला व बालकल्याण, तसेच युवा व क्रीडा संसदीय समिती सदस्य पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल नांदगाव चौरस्ता हिंगणघाट येथे त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
त्याप्रसंगी सर्वश्री उपतालुकाप्रमुख प्रकाश अनासाणे, माजी नगरसेवक मनीष देवडे, नितीन वैद्य, अविनाश धोटे, दिनेश धोबे, फिरोज खान, शकील अहमद, आशिष वाघ, आकाश सुरकार, चंदू भुते, सचिन धोटे, धीरज धोटे, गणेश ढेकले, आशिष रेवतकर, आशिष जुगणे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.

