अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- धर्मचक्र प्रवर्तन दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगणघाट येथे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सोमवारला धम्म दिक्षा दिना निमित्याने भव्य धम्म रैलीचे आयोजन करण्यात आले. या धम्म रेलीचे नेतृत्व पूज्य भदंत ज्ञानज्योती (महाथेरो) संघाराम गिरी व संघ धम्म रैली हे करणार आहे. या धम्म रॅलीचा मार्ग आरंभ’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – वीरभगत सिंह वॉर्ड – लोटन चौक – मिलिंद सोसायटी – (छत्रपती शिवाजी महाराज चौक) – नंदोरी चौक – प्रज्ञा नगर – आदर्श नगर – संविधान चौक -(कलोडे चौक) – प्रबुद्ध नगर – दिक्षाभूमी – सिद्धार्थ नगर – येथे धम्म रैलीचे समापन होणार आहे
त्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता धम्मदेसनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ठिकाण दिक्षाभूमी सिद्धार्थ नगर, दुरसंचार विभाग कार्यालया जवळ होणार आहे. यावेळी कार्यक्रमाला येतांना उपासक उपासिकांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावे. असे आव्हान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२४ व समस्त बौद्ध उपासक व उपासिका हिंगणघाट ने केले आहे.

