*कुरखेडा: -* इतर क्षेत्रापेक्षा टपाल क्षेत्र हा वेगळा आहे. काम जास्त व वेतन कमी मिळत असतो. सोबतच त्यांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सुटल्याने सुटत नाही तरीही तेथील सर्व कर्मचारी आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडत असतात. कोसोदूरचे आलेले पत्र असो की इतर साहित्य प्रामाणिकपणे घरापर्यंत पोहोचवत असतात ही एक प्रकारची सेवा आहे. हीच प्रामाणिक सेवा बघून जागतिक टपाल दिना निमित्य मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी कुरखेडा येतील पोस्ट कार्यालयाला भेट दिली. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या,त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला व जागतिक टपाल दिना निमित्य पुष्पगुच्छ, भेटवस्तू देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी येथील सर्वच कर्मचारी वृंदानी बोलताना म्हणाले की, एका अर्थाने बघितले तर आमच्या पर्यंत कोणीच पोहोचत नाही आणि या शुभ दिनानिमित्त तेवढ्या प्रमाणात कोणीच आम्हाला शुभेच्छा देत नाही. गेल्या काही वर्षात असेच आपल्या सारखे व्यक्तीमत्व यायचे हळूहळू आता समाजाला आमचा विसर पडत चाललेला आहे. पण,आज आपण एक महिला असून सुद्धा आमच्या कार्याची जाणीव ठेवून आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी वेळ काढले फार आनंद झाला. समाजात असे व्यक्तीमत्व फार कमी असतात म्हणून सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे आभार मानले व त्यांच्या साहित्यिक तसेच सामाजिक कार्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्या शुभ प्रसंगी तेथे उपस्थित असलेले टपाल कार्यालयाचे मुख्य अधिकारी टाकाळकर, पिए झिशान खान,पिए,तोमर सर, पोस्टमन नंदेश्वर ,देशमुख, देवराव मोरे, गोपाल होळंबे, तिलक ठलाल प्रामुख्याने उपस्थित होते.

