सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो 9764268694
बल्लारपूर ;-दि. 11/10/2024
बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथील किराणा दुकान व्यवसायिक रमेश डेरकर यांचा मुलगा भुवन डेरकर याने कारागृह पोलिस भरतीत नागपूर विभागातून अव्वल येऊन बल्लारपूर तालुक्याचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाची माहिती मिळताच गावातील त्याच्या मित्रांनी व गावकऱ्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. फटाक्यांच्या आतीषबाजीसह त्याच्यावर गुलाल उधळून आनंद साजरा करण्यात आला. बल्लारपूर शहरातील स्टडीट्रॅक अकॅडमी मध्ये रोहित जंगमवार सर यांच्या मार्गदर्शनात भुवन ने पोलिस भरतीची तयारी केली होती. या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भुवन ने त्याच्या या यशाचे श्रेय आईवडील तसेच स्पर्धा परिक्षा शिक्षक रोहित जंगमवार यांना दिले आहे.

