विजयी सर्व विद्यार्थ्याची विभागीय स्तरीय स्पर्धेसाठी झाली निवड.
हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- दि. 20 ऑक्टोंबर रोज रविवारला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर यांच्या वतीने तालुका क्रीडा संकुल ब्रह्मपुरी येथे जिल्हास्तरीय आष्टेडू आखाडा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यात विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामधून सेंट थॉमस इंग्लिश मीडियम शाळेची 6 वी वर्गात विद्यार्थ्यांनी तुलसीरत्न मोरे यानी वयोगट 17 मूली मधील आष्टेडू आखाडा (दांडपट्टा) मध्ये प्रथम क्रमांक आणि प्रिन्स तोगारे यांनी वयोगट 14 मुले मधील शिवकला मध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव गौरांकित केले.
यावेळी विजयी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे व्यवस्थापक फादर सोमी वर्गीस यांनी सत्कार केला आणि उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर नवीन मारिया यांच्या मार्गदर्शनात क्रीडा शिक्षक विवेक शर्मा यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी यश संपादन केले हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केले.
