प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील बुरकोनी या छोट्याशा गावातील डॉ. प्रदिप चिंधुजी वरघने हा मुलगा आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने हृदयरोग तज्ञापर्यंत ( interventional cardiologist) पोहोचला.
डॉ. प्रदीप वरघाने या शेतकरी आणि गरीब घरातला मुलाने आपल्या प्रत्येक यशासाठी खूप संघर्ष केला आहे. त्याचे प्राथमिक व शालेय शिक्षण 10 वी पर्यंत प्राथमिक शाला व साई बाबा विद्यालय बुरकोनी येथून झाले असून 11वी, 12वी चे शिक्षण जेबी सायन्स वर्धा येथून झाले आहे. त्यांनी जीएमसी अकोला (GMC Akola) येथून MBBS केले आहे. त्यानंतर त्यांनी MD MEDICINE केले आहे. सुपर स्पेशलायझेशनसाठी त्यांनी फोर्टिस मुंबई (Fortis Mulund) येथून DNB cardiology ची निवड केली.
त्यांनी डॉ. पिंटो, डॉ. मॅथ्यू, डॉ. यश लोखंडवाला, डॉ. राजीव कर्णिक, डॉ. रावत, डॉ. लिमए, डॉ. पोतदार आणि इतर अनेक कार्डियोलॉजी क्षेत्रातील दिग्गजांसह त्यांनी काम केले आहे. डॉक्टर म्हणून प्रोफेशनल असण्यासोबतच त्याला पुस्तके वाचायला, क्रिकेट खेलायला, आरोग्य जागृतीचे व्हिडिओ आणि ब्लॉग बनवायला आवडतात. त्याला अनेक ठिकाणी फिरायला आवडते आणि त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. सध्या ते चंद्रपुरात हृदय रोगतज्ज्ञ (cardiologist) म्हणून प्रॅक्टिस करत आहेत.

