*_भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजयी करण्याचे आवाहन_*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809
दिं.०५ नोव्हेंबर २०२४
चामोर्शी तालुक्यातील श्रीकृष्णनगर/ श्रीनिवासपूर येथे मा.खा. अशोकजी नेते यांनी दीपावली उत्सव आणि कालीमाता पूजनाच्या निमित्ताने गावाला भेट देत धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी कालीमातेचे दर्शन घेतले व गावातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, विकासाच्या अपेक्षा याबद्दल संवाद साधला.
अशोकजी नेते यांनी उपस्थितांना संबोधित करताना पुढील विधानसभा निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंदजी नरोटे यांना विजय मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. विकासाच्या दृष्टीने भाजप महायुतीचा उमेदवार सक्षम आहे आणि पुढील काळात या भागाच्या प्रगतीसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी उत्साहाने त्यांचे स्वागत केले.
या बैठकीत सोबत जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिषभाऊ पिपरे, सरपंच हृदय जी बाला,माजी पं.स सदस्य तथा ता.महामंत्री विष्णूजी ढाली, ग्रा.प.सदस्या सौ.चंदनताई घरामी,कथावाचक मनीमोहन राँय,खोकनदास बारुल,विचारण हलदार,किशोर घरामी तसेच भाजपा कार्यकर्ते आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

