Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

विदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत चक्क माजी केंद्रिय मंत्री आणि भाजपा उमेदवाराला नाकारला प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 13, 2024
in गडचिरोली, चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
विदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत चक्क माजी केंद्रिय मंत्री आणि भाजपा उमेदवाराला नाकारला प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आता प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असताना चिमूर विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे फायर ब्रॅण्ड नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पण या जाहीर सभेत माजी केंद्रिय मंत्री आणि अनेक विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवाराला मंचावर स्थान न मिळाल्याने खळबळ माजली आहे.

चिमूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर व राजुरा मतदार संघाचे उमेदवार यांना मंचावर स्थान मिळाले नाही. त्यामुळे संपूर्ण विदर्भात वेगवेगळ्या राजकीय चर्चाला उत आला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सरकारमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री असलेल्या आणि विद्यमान मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. पण हंसराज अहिर यांना नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत साध्ये स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपा महायुतीच्या पूर्व विदर्भातील 9 उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा चिमूर येथे मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत पूर्व विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा जिल्हातील विधानसभा मतदार संघातील 9 उमेदवार सभा मंचावर होते. यामध्ये चिमूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार आमदार किर्तीकुमार भांगडिया, बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, वरोरा विधानसभेचे करन देवतळे, ब्रम्हपुरी विधानसभेचे कृष्णलाल सहारे, चंद्रपूर विधानसभेचे किशोर जोरगेवार, उमरेड विधानसभेचे राजू पारवे व इतर उमेदवारांचा समावेश होता. या जाहीर सभेला माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर निमंत्रित होते. त्यांची खुर्ची देखील सभामंचावर लावण्यात आली होती.

मात्र पंतप्रधान यांच्या सुरक्षेतील अधिकाऱ्यांनी तथा पीएमओ कार्यालयातून आलेल्या निर्देशा नुसार माजी केंद्रीय मंत्री हंसराजअहिर यांना सभामंचावर स्थान दिले गेले नाही. त्यामुळे हंसराज अहिर नाराज झाले. परिणामी अहिर सभास्थळ येथून नाराज होऊन निघून गेले. तीच अवस्था राजुरा येथील भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांची झाली. देवराज भोंगळे यांचे नाव नऊ उमेदवार यांच्यात नव्हते. तसेच त्यांचे नाव व फोटो देखील मंचावर लावलेल्या बॅनर मध्ये नव्हते. त्यामुळे त्यांना मंचावर प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, भोंगळे सभास्थळ येथून एकटेच निघून गेले. तसेच भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे नाव होते. मात्र त्यांचा सभा मंचचा पास बनलेला नव्हता. त्यामुळे त्यांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे ते देखील सभास्थळ येथून निघून गेले.

Tags: चिमूर विधानसभा मतदार संघप्रधानमंत्री नरेंद्र मोदीभारतीय जनता पक्षहंसराज अहिर
Previous Post

आलापल्ली जि.गडचीरोली येथे अहेरी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम यांच्या प्रचारसभा कार्यक्रमात उपस्थित

Next Post

पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच!* सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला अजून मजबुती *धर्मराव बाबा आत्राम मोठ्या मताधिक्यानी जिंकण्याचे स्पष्ट चित्र

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच!* सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस  (अजित पवार गट) पक्षाला अजून मजबुती *धर्मराव बाबा आत्राम मोठ्या मताधिक्यानी जिंकण्याचे स्पष्ट चित्र

पक्ष प्रवेशाची मालिका सुरूच!* सिरोंचा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला अजून मजबुती *धर्मराव बाबा आत्राम मोठ्या मताधिक्यानी जिंकण्याचे स्पष्ट चित्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In